loader image

है तैयार हम – मनमाड मध्ये सुरक्षादलाचे संचलन

Oct 14, 2022


गुरुवारी सायंकाळी मनमाड शहरातील प्रमुख मार्गांवर बी एस एफ ( सीमा सुरक्षा दल ) च्या ३२ जवानांनी सशस्त्र संचलन केले. सध्या सण, उत्सव किंवा राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तसेच कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल असे कुठलेही कार्यक्रम नसतांना सुरक्षा दलाचे संचलन झाल्याने नागरिकांमध्ये चर्चा पहावयास मिळाली. शहरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये, घडल्यास नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही सज्ज आहोत याचा आढावा घेऊन पाहणे व नागरिकांना दिलासा देण्यासाठी बी एस एफ च्या पथकाने पथ संचलानाचा उपक्रम राबविला.

ह्या पथसंचलनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांसह पोलीस कर्मचारी सामील झाले होते.


अजून बातम्या वाचा..

.