loader image
[ays_poll id=7]

इगतपुरी – कसारा दोन रेल्वे लाईन साठी हिरवा कंदील – ९ कोटी निधी

Oct 14, 2022

कसारा ते इगतपुरी दरम्यान चौथी आणि पाचवी रेल्वेलाईन टाकण्याच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या वित्त संचालनालयाने 8 कोटी 70 लाख रूपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. त्यामुळे आणखी दोन रेल्वेलाइन आणि बोगदयाच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल लवकर पूर्ण होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून इगतपुरी-कसारा नव्या रेल्वे लाईन साठी मागणी होती. नाशिक इगतपुरीहून मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ही मागणी जोर धरत होती. अखेर गोडसे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. नाशिकरोड ते मुंबई हा प्रवास जलदगतीने होण्यासाठी इगतपुरी – कसारा या दरम्यानच्या घाट क्षेत्रात सर्वच रेल्वेगाड्या कमी वेगाने धावतात. तसेच सिग्नल मिळत नसल्याने त्यांना सक्तीचा थांबा घ्यावा लागतो. यातून मार्ग काढण्यासाठी कसारा ते इगतपुरी या दरम्यान चौथी आणि पाचवी रेल्वेलाईन टाकण्याच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या वित्त संचालनालयाने आठ कोटी सत्तर लाख रूपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून दिल्यामुळे दोन नवीन रेल्वेमार्ग आणि बोगदयाच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल लवकर पूर्ण होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड नगर परिषदेचे कोरोनामुळे बाधित मृत कर्मचारी श्री उन्मेश कुलकर्णी यांच्या पत्नी श्रीमती कुलकर्णी यांना आमदार सुहास अण्णा कांदे,नगराध्यक्ष योगेशभाऊ पाटील, मुख्याधिकारी शेषराव चौधरी तसेच सर्व नगरसेवक यांचे उपस्थितीत शासनाकडून प्राप्त र. रु. ५० लक्ष चा धनादेश वितरित करण्यात आला.

मनमाड नगर परिषदेचे कोरोनामुळे बाधित मृत कर्मचारी श्री उन्मेश कुलकर्णी यांच्या पत्नी श्रीमती...

read more
मजुराची आत्महत्या

मजुराची आत्महत्या

नांदगांव :सुमितकुमार जगधने येथील रेल्वे मालधक्क्यावर मजुरीचे काम करून घरी जात असल्याचे सांगून...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची नंदुरबार जिल्हासंघाच्या संभावित अंडर 16 खेळांडुमध्ये निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची नंदुरबार जिल्हासंघाच्या संभावित अंडर 16 खेळांडुमध्ये निवड

मनमाड - महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्य़ातील अंडर 16...

read more
मनमाड  येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी...

read more
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय येथील वाणिज्य विभागाचे कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथे अभ्यास भेट.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय येथील वाणिज्य विभागाचे कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथे अभ्यास भेट.

मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांची औद्योगिक-शैक्षणिक भेट...

read more
.