loader image

निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा

Oct 14, 2022


निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत करण्याचा ७५५ कोटी रुपये वितरित करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टीग्रस्त मात्र निकषात न बसणाऱ्या जिल्ह्यांना निधी वितरित करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

आज मदत व पुनर्वसन विभागाने ७५५ कोटी रुपयांच्या निधीचे औरंगाबाद, अमरावती आणि पुणे विभागातील नऊ जिल्ह्यांना वितरण करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या व निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने यातून दिलासा दिला आहे.


अजून बातम्या वाचा..

.