loader image

आधुनिक तंत्रज्ञानाचे नोझल नगर पालिकेच्या अग्निशमन विभागात दाखल

Oct 17, 2022


मनमाड नगरपालिकेच्या अग्निशमन विभागात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.यापूर्वी पाण्याची फवारणी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रेशर पाईपला वापरण्यात येणारे नोझल हे पाच किलो वजनाचे होते ती आता आधुनिक तंत्राचा वापर करून तो नोझल न वापरता केवळ एकाच नोझलमध्ये तीन नोझलचा वापर करता येणार आहे त्यामुळे मनुष्यबळ संख्येची गरज घटली आहे व कोणीही व्यक्ती त्याचा सहजगत्या वापर करू शकतो अशी सोपी यंत्रणा आहे अशी यंत्रणा मनमाड नगरपालिकेच्या अग्निशमन विभागात कार्यरत करण्यात आली सदर आधुनिक नोझल कोल्हापूर येथील हायर फ्लाय कंपनी यांच्याकडून मागवण्यात आली आहे आग लागल्याच्या दुर्घटनेत याचा वापर करणे आता सहज शक्य झाले आहे ते केवळ आधुनिक तंत्रज्ञानामुळे या नोझलचे प्रात्यक्षिक नुकतेच घेण्यात आले मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर सचिन कुमार पटेल यांनी स्वतः हे अत्याधुनिक नोझल लावून त्याची चाचणी घेतली यावेळी पालिका कर्मचारी अधिकारी आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते


अजून बातम्या वाचा..

.