मनमाड – बुद्धवाडी येथील कपिलवस्तू बुद्ध विहारात आषाढ ते अश्विन पौर्णिमा असे तीन महिने अखंड सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाचा सांगता सोहळा उद्या रविवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता संपन्न होत आहे.या काळात “बुद्ध आणि त्यांच्या धम्म” या पवित्र ग्रंथाच्या वाचन करण्यात आले. त्याची समाप्ती व बुद्ध प्रवचनाचा कार्यक्रमाबरोबरच लोकवर्गणीतून आणण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचेही बुद्ध विहारात अनावरण करण्यात येणार आहे.कार्यक्रमानंतर भोजनदानही केले जाणार आहे.शहरातील बौद्ध उपासक – उपासिका यांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन
महामाया महिला मंडळ
कपिलवस्तू बुद्ध विहार विकास समितीतर्फे करण्यात आले आहे.

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड
मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...