मनमाड – (तळेगाव रोही)आज भारतरत्न,युवकांचे प्रेरणास्थान डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतनिमित्त संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळेगांव रोही येथे “वाचन प्रेरणा दिन” विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.संसारे मॅडम, पर्यवेक्षक श्री गाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.विद्यालयाचे शिक्षक श्री.काळे सर यांनी विद्यार्थ्यांना कलाम सरांचे जीवनचरित्र,वाचनाचे महत्व यावर मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांची भाषणे झाली. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची पुस्तके वाचली. तसेच आज जागतिक हात धुवा दिन या निमित्ताने विद्यार्थ्यांना हात धुण्याचे व शारीरिक स्वच्छतेचे महत्व सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी आजच्या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि आपले अनुभव सांगितले.यावेळी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड
मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...