loader image

डॉक्टर कलाम यांच्या कार्याला उजाळा

Oct 17, 2022


कवी रवींद्रनाथ टागोर विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा येथील के आर टी विद्यालय मध्ये माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळेस उपप्राचार्य वैभव कुलकर्णी विश्वस्त धनंजय निंभोरकर शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर हे उपस्थित होते. मिसाईल मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी आपल्या कार्य कालावधीत देशातील असंख्य शाळा महाविद्यालय विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. आणि भारत हा जगातील एकच स्वयंपूर्ण तसेच महासत्ताक देश 2020 पर्यंत करता येईल याबाबत त्यांनी व्हिजन विद्यार्थ्यांसमोर सादर केले. भ्रष्टाचार विरहित आणि काटकसरीने देश कसा चालविता येईल यांचा आदर्श ही त्यांनी आपल्या वर्तणुकीतून घालून दिला. शाळेचे प्राचार्य मिसरसर यांनी कलामांचा आदर्श देशातील प्रत्येक विद्यार्थ्याने घ्यावा .डॉक्टर कलाम यांच्या जयंती निमित्ताने झालेल्या वाचन प्रेरणा दिनात बोलत होते. डॉक्टर कलाम यांच्या संशोधन कार्य बद्दल माहिती त्यांनी दिली. डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त के आर टी शाळेची पुस्तकांची ग्रंथसंपदा वाचकांसाठी विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली. डॉक्टर कलाम यांच्या विषयी माहिती आणि वाचाल तर वाचाल ही काळाची गरज लक्षात घेऊन वाचनाचे महत्त्व पटवून दिले. त्या धकाधकीच्या जीवनात वाचन कुठेतरी बाजूला जात असताना अशा उपक्रमांनी नव्या पिढीला प्रेरणा मिळविण्यासाठी शाळेने विद्यार्थ्यांना वेगवेगळे गोष्टींची प्रवास वर्णने ऐतिहासिक आदी विविध विषयांच्या पुस्तकांचा व मान्यवर लेखकांची पुस्तके उपलब्ध करून देत एक तास वाचनाचा हा उपक्रम राबविला. त्यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
.