loader image

दिव्यांग बांधवांची दिवाळी होणार गोड भाजपा दिव्यांग आघाडी व मनमाड दिव्यांग ग्रुप च्या प्रयत्नाला यश

Oct 17, 2022


दिनांक 04/10/2022 रोजी मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल यांना दर वर्षी मिळणारी 5% अपंग( ( दिव्यांग) निधी ह्या वर्षी ही दिवाळी पुर्वी मिळावी व सदर
5% दिव्यांग निधी दिव्यांग बांधवांच्या बैंक खात्यात जमा करावी,याबाबत निवेदन देण्यात आले होते.पण काही अपुर्ण फ़ंड मुळे ह्या दिवाळी ला 5% अपंग निधीचे वाटप करता येणार नाही तसेच एप्रिल महिन्यात निधीचे वाटप झाल्याने आता दिवाळी पुर्वी निधी देता येणार नाही असे कारण पुढे करण्यात आले. परंतू भाजपा दिव्यांग आघाडी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष व मनमाड दिव्यांग ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष बुरहान शेख यांनी 5% निधी दिव्यांग बांधवांना दिवाळी पुर्वी मिळावा ह्यासाठी अथक प्रयत्न केले व सतत पाठपुरावा केला सदर कामात भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जय फुलवानी व दिव्यांग बांधवांचे वेळोवेळी सहकार्य लाभले.आज दिनांक 17/10/2022 रोजी मा.मुख्याधिकारी ,कातकडे साहेब,आगोने साहेब, कुशारे सर,पाईक साहेब व अकाउंट विभागाशी चर्चा व संपर्क साधून 5%अपंग कल्याण निधी वाटपाची मंजुरी आदेश देण्यात आले.त्याबद्दल मुख्याधिकारी साहेब, पाईक साहेब, कातकडे साहेब,आगोने साहेब,कुशारे,किरण अहेर् व अकाउंट विभागाचे कर्मचारी यान्चे भाजपा दिव्यांग आघाडी नाशिक जिल्हा उपअध्यक्ष बुरहान शेख व भाजपा मनमाड शहरअध्यक्ष जय फुलवानी यांच्यातर्फे
हार्दिक धन्यवाद व आभार व्यक्त करण्यात आले.ह्या वेळी संतोष पगारे, सुभाष सांगळे,इब्राहिम सय्यद, लुक्मान खान,अंबर परदेशी, मोहसीन करेशी, शालिनी ताई ई .दिव्यांग बांधव उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.