loader image

कपिलवस्तू बुद्धविहारात वर्षावास सोहळ्याची सांगता

Oct 18, 2022


मनमाड – बुद्धवाडी येथील कपिलवस्तू बुद्ध विहारात आषाढ ते अश्विन पौर्णिमा अखंड तीन महिने सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाचा सांगता सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बुद्ध विहार विकास समितीचे अध्यक्ष अरुण अंकुश होते.प्रारंभी केंद्रीय शिक्षक भागवतराव गांगुर्डे, बौद्धाचार्य मच्छिन्द्र भोसले यांनी बुद्ध वंदना घेतली.गेल्या तीन महिन्यांपासून “बुद्ध आणि त्यांच्या धम्म” या पवित्र ग्रंथाच्या शेवटच्या पानांचे वाचन करून सांगता करण्यात आला.यावेळी लोकवर्गणीतील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे बुद्ध विहारात अनावर करण्यात आले.
माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, एस.सी.एस.टी. रेल्वे असो.झोनल सचिव सतीश केदारे ,वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्षा ऍड.आम्रपाली निकम, डायमंड ग्रुपचे अध्यक्ष रत्नदीप पगारे यांनी मार्गदर्शन करतांना वर्षावास कार्यक्रमाचे महत्व विशद केले.माजी नगराध्यक्ष व शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक ,जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, माजी नगरसेवक बंडूनाना सांगळे, भारतीय बौद्ध महासभेचे संदीप खरे ,पुरुषोत्तम सव्वाखंडे आदींसह विविध विभागातील महिला मंडळांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.विहार समितीचे सचिव अशोक गरुड व वर्षा शेजवळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तर वर्षावास समितीच्या अध्यक्षा शालुबाई भोसले यांच्यासह महामाया महिला मंडळाच्या महिलांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.