मनमाड – बुद्धवाडी येथील कपिलवस्तू बुद्ध विहारात आषाढ ते अश्विन पौर्णिमा अखंड तीन महिने सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाचा सांगता सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बुद्ध विहार विकास समितीचे अध्यक्ष अरुण अंकुश होते.प्रारंभी केंद्रीय शिक्षक भागवतराव गांगुर्डे, बौद्धाचार्य मच्छिन्द्र भोसले यांनी बुद्ध वंदना घेतली.गेल्या तीन महिन्यांपासून “बुद्ध आणि त्यांच्या धम्म” या पवित्र ग्रंथाच्या शेवटच्या पानांचे वाचन करून सांगता करण्यात आला.यावेळी लोकवर्गणीतील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे बुद्ध विहारात अनावर करण्यात आले.
माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, एस.सी.एस.टी. रेल्वे असो.झोनल सचिव सतीश केदारे ,वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्षा ऍड.आम्रपाली निकम, डायमंड ग्रुपचे अध्यक्ष रत्नदीप पगारे यांनी मार्गदर्शन करतांना वर्षावास कार्यक्रमाचे महत्व विशद केले.माजी नगराध्यक्ष व शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक ,जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, माजी नगरसेवक बंडूनाना सांगळे, भारतीय बौद्ध महासभेचे संदीप खरे ,पुरुषोत्तम सव्वाखंडे आदींसह विविध विभागातील महिला मंडळांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.विहार समितीचे सचिव अशोक गरुड व वर्षा शेजवळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तर वर्षावास समितीच्या अध्यक्षा शालुबाई भोसले यांच्यासह महामाया महिला मंडळाच्या महिलांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड
मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...