काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार मल्लिकार्जुन खर्गे विजयी झाले आहेत. खर्गे यांनी शशी थरुर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे. याबाबतची औपचारिक घोषणा लवकरच करण्यात येणार असून काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांनी खर्गे यांचे अभिनंदन केले आहे. खर्गे यांना 7897 मते मिळाली. तर थरूर यांच्या पारड्यात 1072 मते आली. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 9385 जणांनी मतदान केले होते.
मनमाड ता. २७ : महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा मोबाईलमध्ये गुंतलेल्या आजच्या तरुण पिढीच्या मनामनांत रुजावा यासाठी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेला गड किल्ले बांधणीचा आदर्श उपक्रम हा समाजातील युवा पिढीशी मातीची बांधिलकी निर्माण करणारा आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी येथे केले.
[contact-field...











