loader image

वृध्दाश्रम ही संकल्पना आपल्या देशाला न शोभणारी – छत्रपती संभाजी राजे

Oct 19, 2022


वडनेर भैरव प्रतिनिधी
वृद्धाश्रमआश्रम ही संकल्पनाच आपल्या देशाला न शोभणारी आहे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात वयाची ७५ पूर्ण करणाऱ्या व्यक्तींचा अमृत महोत्सव व सहस्रचंद्रदर्शन कार्यक्रम म्हणजेच मातृ-पितृ वंदनगौरव हा उपक्रम ज्येष्ठ प्रती आदर करण्याबरोबरच इतरांना देखील प्रेरणादायी आहे म्हणून सलादे बाबा ट्रस्टने मातृ-पितृ वंदन या राबवलेल्या उपक्रमाचे स्वागतच करायला हवे असे गौरवोद्गार कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांनी वडनेर भैरव येथे आज अमृत महोत्सवी मातृ-पितृ वंदन स्तरीय सोहळ्यात बोलताना व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी उद्योजक गौतम बापू पाटील हे होते
नाशिक जिल्ह्यातील वय वर्ष 75 पूर्ण केलेल्या 75 व्यक्तींची प्रत्येक तालुक्यातून निवड करून भारतीय अमृत महोत्सवाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी राजे यांच्या शुभ हस्ते त्यांच्या सन्मान कार्यक्रम सलादे बाबा ट्रस्ट यांनी आज आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौतम पाटील हे होते.
छत्रपती संभाजी राजे यांनी कालभैरवनाथ मंदिर ऐतिहासिक स्थळाला भेट देत अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या कार्याची माहिती घेतली. ट्रस्टचे अध्यक्ष योगेश साळुंखे व सर्व विश्वस्तांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

अमृत महोत्सवी मातृ-पितृ वंदन कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज नाथ उपदेशी सलादे बाबा प्रथम सरपंच स्वातंत्र्यसैनिक रावसाहेब भालेराव यांच्या प्रतिमा पूजन करून दिपप्रज्वलाने झाली. कार्यक्रमाच्या ठिकाणी आयोजक ट्रस्टच्या वतीने मनोहर नाना पाटोळे दत्ता शिंदे दत्तात्रय निखाडे मानसिंग ढोमसे यांनी सन्मान केला यावेळी प्रमुख अतिथी करण गायकवाड यांचा सन्मान सुरेश पवार सोनू सगर व राहुल पाचोरकर यांनी केला कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतम बापू पाटील यांचा सन्मान सरपंच सुनील पाचोरकर यांनी केला स्वागत अनिल अशोकराव भालेराव यांनी केले ग्रामपंचायतच्या वतीने छत्रपती संभाजी राजे यांचा सन्मान सरपंच सुनील पाचोरकर उपसरपंच योगेश साळुंखे यांनी केला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अमोल भालेराव रामभाऊ भालेराव एनडीमाळी पोपटराव पाचोरकर नंदूशेठ जंगम प्रमोद माळी राजाभाऊ भालेराव अनिल पवार गणेश निंबाळकर प्रमोद माली प्रभाकर भालेराव शिवाजी शिंदे भाऊसाहेब भालेराव विक्रम सलादे विलास भवर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती या सर्वांचा सन्मान सलादे बाबा ट्रस्ट वतीने करण्यात आला गौतमबापू पाटील बापू सलादे शिरसाट रामचंद्र मोरे यांनी केला.
यावेळी राजे यांनी मातृ-पितृ वंदन या कार्यक्रमाबाबत बोलताना व्यक्त केले की वृद्धाश्रम ही भारतीय संस्कृती नाही तर भारताने जगाला मातृ पितृ देवो भव ही संकल्पना राबवली आहे देवा इतकेच आई-वडिलांना महत्त्व आपल्या संस्कृतीने दिलेले आहे सलादे बाबा ट्रस्टच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75 जेष्ठ नागरिकांचा वयाची 75 ही पूर्ण केली म्हणून सन्मान होणे ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे ज्येष्ठ नागरिक ही अनुभवाची खाण असून ट्रस्टच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आभार मानण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतम बापू पाटील यांनी भारतीय संस्कृतीचे पाईक म्हणून ट्रस्टच्या वतीने राजांच्या उपस्थितीत आई-वडिलांना वंदन करण्याचा आखलेला कार्यक्रम हा प्रेरणादायी आहे असे मनोगत व्यक्त केले वडनेर भैरव चे सरपंच सुनील पाचोरकर यांनी वडनेर भैरव गावच्या वतीने राजांचे स्वागत करून कार्यक्रमाचे आयुष्यात केले तर प्रास्ताविक आयोजक राहुल पाचोरकर यांनी केले.
वडनेर भैरव आशा वर्कर च्या वतीने संभाजीराजे यांना निवेदन देण्यात आले कार्यक्रमाचे आयोजक श्री सुरेश सलादे यांनी राजांच्या कार्याची माहिती दिली सूत्रसंचालन कवी डॉक्टर कैलास सलादे सौ निकिता मनीष सलादे यांनी केले तर आभार युवराज सगर यांनी मांडल कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिनकर रसाळ मधुकर पाचोरकर युवराज सगर मनोहर पाटोळे रामचंद्र मोरे दत्ता शिंदे यांनी परिश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.