loader image

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांचे सरसकट पंचनामे करावे -स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

Oct 19, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव तालूक्यात सप्टेंबर ऑक्टोंबर मध्ये अतीवृष्टी झाल्याने शेती पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले . सदर पिकाचे आठ दिवसात सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून मोठे आंदोलन छेडण्यात येइल अशा आशयाचे निवेदन तहसिलदार डॉ. सिद्बार्थ मोरे यांना देण्यात आले.

तालुक्यात सप्टेंबर/ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अति वृष्टीने मका,कपाशी, सोयाबीन तसेच कांदा रोपाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.शासनाने १९/ ०९ / २२ रोजी प्रशासनाला पंचनाम्याचे आदेश दिले असतानाही तब्बल २० ते २५ दिवस उशिरा ने पंचनामे केल्याने काही शेतकऱ्यानी पिके काढून घेतली तर काही शेतातील साचलेले पाणी सुकून गेल्याने या पंचनाम्या पासून ९० % टक्के शेतकरी वंचीत राहीले .
तालुक्यातील ग्रामसेवक / तलाठी / कृषी सहाय्यक यांनी ठरावीक शेतकऱ्यांच्या सहया घेवून बरेचशे गावे यातून वगळून टाकले . व काही गावावर स्थगिती दर्शवली .
कपाशी,कांदे या पिकांचे पंचनामे करण्यास प्रशासन टाळाटाळ करीत आहे. कपाशी पिकावर लाल्या रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे कपाशी पिकाचे ६० ते ७० % नुकसान झाले आहे. तरी सदर पिकांचे येत्या आठ दिवसात सरसकट पंचनामे न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना, आम आदमी पार्टी तसेच कांदा उत्पादक संघटना तीव्र आंदोलन करेल सदर निवेदनावर निलेश चव्हाण,सोमनाथ मगर,विशाल वडघुले,योगेश वाघ,अनील पवार, अरूण आहेर,सोपान सानप,अनील आहेर आदिंच्या सहया आहे.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.