नांदगाव : मारुती जगधने
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ,संचालित व्ही.जे.हायस्कूल येथे पर्यावरण पूरक आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा शालेय अभ्यासा व्यतिरिक्त विद्यार्थांना नवीन गोष्टी शिकण्याचा आनंद मिळावा व विद्यार्थाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळा विविध उपक्रम राबवीत असते. या वर्षी शाळेने विद्यार्थ्यांसाठी स्वानंद उपक्रम सुरु केला आहे या सर्व विषयाचे वर्षभरात विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत .या दिवाळी निमित्त चित्रकला विषया अंतर्गत आकाशकंदील तयार करणे तीन दिवसाची कार्यशाळा घेण्यात आली विद्यार्थी दिवाळीच्या सुट्टीचा स्वनिर्मितीचा आनंद या कार्यशाळेतून विद्यार्थांनी घेतला .कलाशिक्षक विजय चव्हाण यांनी विद्यार्थांना पर्यावरण पूरक आकाशकंदील तयार करण्याची संकल्पना विद्यार्थांकडून साकार करून घेतली त्यांनी या तीन दिवसात विविध पेपरचा उपयोग करून त्या पेपरची कटिंग,पेपरवर डिझाईन काढून चिटकविणे , रंगकाम करणे असे बारीकसारीक गोष्टींचे मार्गदर्शन करून आकाशकंदील तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले .यात विद्यार्थांनी या तीन दिवसाच्या कार्यशाळेत टप्प्या टप्प्या सर्व कलाकुसर आत्मसात करून सुंदर असे आकाशकंदील तयार केले.विद्यार्थांनी तयार केलेले आकाशकंदील स्वता विद्यार्थी आप-आपल्या घरी लावणार आहेत.या कार्यशाळेसाठी कलाशिक्षक विजय चव्हाण व चंद्रकात दाभाडे यांनी विद्यार्थांना मर्गदर्शन केले.या कार्यशाळेला मुख्याध्यापिका जोत्स्ना आव्हाड , भैय्यासाहेब चव्हाण यांनी हि कार्यशाळेतील विद्यार्थाना मार्गदर्शन करून विद्यार्थांनी बनविलेल्या आकाशकंदीलाचे कौतुक केले. या कार्यशाळेला पत्रकार संजीव निकम,प्रमित आहेर,रोहित शेळके ,किरण भालेकर तसेच पालकांनी भेट देऊन या शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले . कार्यशाळेसाठी नियोजन संदर्भात उपमुख्याध्यापक मनोहर बडगुजर,पर्यवेक्षक मनोहर शिंदे याचे मार्गदर्शन लाभले.

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड
मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...