loader image
[ays_poll id=7]

दिवाळी सुट्टीतील आकाशकंदील तयार करणे कार्यशाळेतून नवनिर्मितीचा अभिनव उपक्रम

Oct 19, 2022

नांदगाव : मारुती जगधने
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ,संचालित व्ही.जे.हायस्कूल येथे पर्यावरण पूरक आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा शालेय अभ्यासा व्यतिरिक्त विद्यार्थांना नवीन गोष्टी शिकण्याचा आनंद मिळावा व विद्यार्थाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळा विविध उपक्रम राबवीत असते. या वर्षी शाळेने विद्यार्थ्यांसाठी स्वानंद उपक्रम सुरु केला आहे या सर्व विषयाचे वर्षभरात विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत .या दिवाळी निमित्त चित्रकला विषया अंतर्गत आकाशकंदील तयार करणे तीन दिवसाची कार्यशाळा घेण्यात आली विद्यार्थी दिवाळीच्या सुट्टीचा स्वनिर्मितीचा आनंद या कार्यशाळेतून विद्यार्थांनी घेतला .कलाशिक्षक विजय चव्हाण यांनी विद्यार्थांना पर्यावरण पूरक आकाशकंदील तयार करण्याची संकल्पना विद्यार्थांकडून साकार करून घेतली त्यांनी या तीन दिवसात विविध पेपरचा उपयोग करून त्या पेपरची कटिंग,पेपरवर डिझाईन काढून चिटकविणे , रंगकाम करणे असे बारीकसारीक गोष्टींचे मार्गदर्शन करून आकाशकंदील तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले .यात विद्यार्थांनी या तीन दिवसाच्या कार्यशाळेत टप्प्या टप्प्या सर्व कलाकुसर आत्मसात करून सुंदर असे आकाशकंदील तयार केले.विद्यार्थांनी तयार केलेले आकाशकंदील स्वता विद्यार्थी आप-आपल्या घरी लावणार आहेत.या कार्यशाळेसाठी कलाशिक्षक विजय चव्हाण व चंद्रकात दाभाडे यांनी विद्यार्थांना मर्गदर्शन केले.या कार्यशाळेला मुख्याध्यापिका जोत्स्ना आव्हाड , भैय्यासाहेब चव्हाण यांनी हि कार्यशाळेतील विद्यार्थाना मार्गदर्शन करून विद्यार्थांनी बनविलेल्या आकाशकंदीलाचे कौतुक केले. या कार्यशाळेला पत्रकार संजीव निकम,प्रमित आहेर,रोहित शेळके ,किरण भालेकर तसेच पालकांनी भेट देऊन या शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले . कार्यशाळेसाठी नियोजन संदर्भात उपमुख्याध्यापक मनोहर बडगुजर,पर्यवेक्षक मनोहर शिंदे याचे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

      मनमाड : येथील शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या सिद्धी क्लासेस...

read more
नरेंद्रजी मोदी 3-0 सरकारचा ऐतिहासिक अर्थ संकल्पा मध्ये देशातील “युवा शक्ती केंद्र बिंदू.”देशाच्या प्रगतीची गती  वाढवणारा गतिमान अर्थ संकल्प ~नितीन पांडे

नरेंद्रजी मोदी 3-0 सरकारचा ऐतिहासिक अर्थ संकल्पा मध्ये देशातील “युवा शक्ती केंद्र बिंदू.”देशाच्या प्रगतीची गती वाढवणारा गतिमान अर्थ संकल्प ~नितीन पांडे

संपूर्ण जगात सतत युद्ध जन्य परिस्थिती चे संकट असताना भारताचे शक्तिशाली पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी  निमित्त गुरुवार दिनांक 05/02/2026 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम🚩

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 05/02/2026 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम🚩

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
जय भवानी व्यायामशाळेच्या तीन खेळाडूंची राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

जय भवानी व्यायामशाळेच्या तीन खेळाडूंची राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

आज नाशिक येथे संपन्न झालेल्या नाशिक विभागीय (नाशिक जळगाव धुळे नंदुरबार)शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड

राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड

मोदीनगर उत्तरप्रदेश येथे ४ ते १४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय यूथ जूनियर व सीनियर...

read more
.