loader image

महाराष्ट्र सरकारकडून नागरिकांना (आनंदाचा शिदा ) दिवाळी भेट

Oct 20, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

महाराष्ट्र शासना मार्फत गोरगरीब जनतेसाठी दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याच्या हेतूने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे व उप मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी भेट (फक्त 100 रुपयांमध्ये ४ वस्तूचे किट) देण्याचे जाहीर केले होते.
आज मनमाड शहरातील कार्डधारकांना आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याने मनमाड शहर शिवसेना कोअर कमिटी च्या उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. लाभार्थी कुटुंबीयांना दीपावली किट चे वाटप करण्यात आले, या मध्ये तेल, चणाडाळ,साखर व रवा या वस्तूचा समाविष्ट आहे.
या प्रसंगी पुरवठा विभागाचे शिंदे साहेब तसेच शिवसेना मनमाड शहर कोअर कमिटी चे राजाभाऊ भाबड, सुनील हांडगे, मयूर बोरसे, अमीन पटेल, वाल्मीक आप्पा आंधळे, गालिब शेख, सुभाष माळवतकर, असिफ पहेलवान, विकास पिंटू वाघ, महेंद्र गरुड, मुकुंद झाल्टे, दादा घुगे, अनिल पगार, संजय नागरे, आप्पा कांदे, सिद्धार्थ छाजेड, सचिन दरगुडे, निलेश व्यवहारे, कुणाल विसापूरकर, नंदू पीठे, महिला आघाडी च्या संगीताताई बागुल विद्याताई जगताप सरलाताई घोगल पूजाताई छाजेड उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
.