loader image

वर्धा – बडनेरा दरम्यान मालगाडीचे डबे घसरले – नागपूर मुंबई रेल्वे वाहतुकीवर होणार परिणाम

Oct 24, 2022


वर्धा आणि बडनेरा दरम्यान मालगाडीचे २० डबे घसरल्याने नागपूर मुंबई मार्गावरील अनेक गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी मालखेड-टीमटाला स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी या दुर्घटनेमुळे प्रवाशांची परवड होण्याची शक्यता आहे.

रविवारी रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी वर्धा आणि बडनेरा दरम्यान मालगाडीचे 20 डबे रुळावरुन घसरल्याची घटना घडली. ही मालगाडी कोळसा घेऊन जात होती. या दुर्घटनेमुळे नागपूर-मुंबई मार्गावरील अनेक गाड्या दुसऱ्या मार्गानं वळवल्या आहेत, तर काही गाड्या रद्दही करण्यात आल्या आहेत.

कोणकोणत्या ट्रेन रद्द झाल्या?

भुसावळ Exp.
नागपूर : सीएसएमटी सुपरफास्ट एक्सप्रेस
नागपूर : अमरावती इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस
गोंदिया : कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस
नागपूर : पुणे एक्सप्रेस
अजनी : अमरावती एक्सप्रेस

ह्या महत्वाच्या गाड्या वळविण्यात आल्या आहेत

पुणे हटीया एक्सप्रेस ही चांदुर बाजार नरखेड मार्गे
अहमदाबाद पुरी एक्सप्रेस
शालिमार एक्सप्रेस
हावडा सीएस एमटी एक्सप्रेस

यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. या दुर्घटनेमुळे नागपूर मुंबई मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसणार आहे. तुम्हीही या रेल्वे मार्गावरुन प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आधी वेळापत्रक पाहा आणि मगच प्रवासासाठी बाहेर पडा.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.