loader image

कमलाक्षाय गणेश मंदिरात दिवाळी पाडवा निमित्ताने दिपोत्सव साजरा

Oct 26, 2022


मनमाड : दिवाळीला लक्ष्मीपूजनानंतर दुसरा महत्त्वाचा आणि वर्षभरातील साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला सण म्हणजे दिवाळी पाडवा. अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दिपोत्सवही या दिवशी केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.याच दिवसाचे ओचीत्य साधुन मनमाड येथील आय. यु. डी. पी. परिसरात असणाऱ्या कमलाक्षाय गणेश मंदिरामध्ये पाडवा पहाटेला दिपोत्सव साजरा करण्यात आला.पहाटे गणेशाची पुजा करून भजन म्हणुन , सुंदर अशी रांगोळी काढुन , सुवसनिणींकडुन श्रीगणेशाची आरती करून दिपोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी परिसरातील महिला भाविक उपस्थित होत्या.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.