Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कमलाक्षाय गणेश मंदिरात दिवाळी पाडवा निमित्ताने दिपोत्सव साजरा

Oct 26, 2022

मनमाड : दिवाळीला लक्ष्मीपूजनानंतर दुसरा महत्त्वाचा आणि वर्षभरातील साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला सण म्हणजे दिवाळी पाडवा. अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दिपोत्सवही या दिवशी केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.याच दिवसाचे ओचीत्य साधुन मनमाड येथील आय. यु. डी. पी. परिसरात असणाऱ्या कमलाक्षाय गणेश मंदिरामध्ये पाडवा पहाटेला दिपोत्सव साजरा करण्यात आला.पहाटे गणेशाची पुजा करून भजन म्हणुन , सुंदर अशी रांगोळी काढुन , सुवसनिणींकडुन श्रीगणेशाची आरती करून दिपोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी परिसरातील महिला भाविक उपस्थित होत्या.

अजून बातम्या वाचा..

मानव मुक्तीच्या चळवळीचा भाष्यकार हरपला,..कविवर्य विनायक पाठारे यांना आदरांजली…!

उजाडरानी किमया केलीस मोठी भिमा तुझ प्रणाम कोटी कोटी।। कविवर्य विनायक (विनय) पाठारे आपल्या आयुष्यभर...

read more

झोनल सचिव सतिशभाऊ केदारे यांची कन्या डॉ. प्रियांका सतिश केदारे यांनी बी.डी.एस. पदवी संपादन केलेल्या बद्दल सत्कार

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन, ट्रॅक्शन कारखाना,नाशिक रोड तर्फे झोनल सचिव सतिशभाऊ...

read more

सुशासन दिन मा.पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भाजपा विद्यार्थी आघाडी तर्फे गरजु लोकांना ब्लॅंकेट वाटप

भारताचे माजी पंतप्रधान,भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी भारतात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]