loader image

ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांनो… स्टेट बँकेने दिला गंभीर इशारा !

Oct 27, 2022


सणासुदीच्या काळात लोक जास्त ऑनलाईन ऑफर्सला भुलून ऑनलाइन खरेदी करतात. त्यानंतर तुमचे नंबर Emails तुम्ही जिथे जिथे दिलेले असतात त्या ठिकाणी ते सुरक्षित आहेत की नाही हे देखील पाहिले जात नाही.SBIने ग्राहकांना ट्वीट करून अलर्ट दिला असून ग्राहकांनी ह्या गोष्टींची प्रामुख्याने काळजी घ्यावी असे सांगितले आहे.

फसवणूक करणाऱ्यांची तुमच्या खात्यावर वाईट नजर आहे. तुमची एक चूक तुमचे खाते रिकामे करू शकते. त्यामुळे तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. ज्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही आणि तुमचं खाते ही सुरक्षित राहील.

तुम्हाला KYC साठी जर फोन आला आणि त्याने तुम्हाला सांगितले की तुमचे KYC झाले नाही तुम्ही ते करा. तर त्यावर विश्वास ठेवू नका. बँक सहसा फोन करत नाही. लेखी व्यवहार असतो. त्यामुळे तुम्ही अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका.

कोणालाही तुमचा OTP नंबर सांगू नका. त्यामुळे तुमचं खाते रिकामे होऊ शकते. तुमच्या खात्यावरील व्यवहार आणि त्यांची माहिती अनोळखी व्यक्तीला कधीही देऊ नका. अनोळखी व्यक्तीकडून आलेली लिंक, तुमच्या खात्याशी संबंधित असलेली माहिती यावर विश्वास ठेवू नका.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.