मनमाड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून परंपरेनुसार भाऊबीजेच्या दिवशी रेड्यांची झुंज लावण्यात येते. कालही महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुलाच्या मैदानावर रेड्यांच्या झुंज लावण्यात आल्या. ह्या वेळी झुंज पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अनेक वर्षांपासून मनमाड शहरातील गवळी समाज ही परंपरा जोपासत आहे.
बी. जी. दरगुडे पब्लिक स्कूल, मनमाड येथे अभिजात राजभाषा मराठी गौरव दिन उत्साहात साजरा
मनमाड येथील बी. जी. दरगुडे पब्लिक स्कूल येथे आज अभिजात राजभाषा मराठी गौरव दिन मोठ्या उत्साहात...











