loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – आय यू डी पी परिसरातील तरुणांचा स्तुत्य उपक्रम

Oct 29, 2022


आय.यु.डि.पी. दर्शन फ्रेंड सर्कल मधील तरुणांनी उत्स्फूर्तपणे एक स्तुत्य ऊपक्रम राबविला. परिसरातील स्वच्छता करून अनेक स्वच्छतेचे, पर्यावरणाचे जनजागृतीपर संदेश देणारे फोमशीट बोर्ड तयार करून प्रत्येक घरांचे गेटवर लावण्यात आले. त्या बोर्डवर एक पाऊल स्वच्छतेकडे, कचरा घंटागाडीतच टाका, स्वच्छ शहर आनंदी शहर, पुढील पिढीसाठी चांगली देन, माझा परिसर स्वच्छ ठेवेन, स्वच्छ सुंदर परिसर आरोग्य नांदेल निरंतर, कचरा योग्य ठिकाणी ठेवा, पृथ्वी, पाणी, हवा ठेवा साफ नाहीतर पुढली पिढी नाही करणार माफ, असा संदेश देण्यात आला. प्रत्येक घराजवळ एक कुंडीमध्ये झाड लाऊन ते कुंडीतील झाडाची जोपासायला परिसरातील नागरिकांना दत्तक म्हणून देण्यात आले. या ऊपक्रमाचे कौतुक परिसरातील श्री. महाले परिवार, शिंपी परिवार, चव्हाण परिवार, साखरे परिवार व महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष सचिन शिरुड या नागरिकांनी केले असून दर्शन फ्रेंड सर्कलच्या तरुणांना शुभेच्छा दिल्या आहेत. दर्शन फ्रेंड सर्कलचे सार्थक महाले, विशाल शिंपी, आकाश घुगे, अनिकेत चव्हाण, अक्षय सोनार, विकी आहिरे, मोहित घुगे, विपीन महाले, विनीत महाले, सिद्धेश महाले, दानिश कुरेशी या युवकांनी हा स्तुत्य ऊपक्रम राबविला.

 


अजून बातम्या वाचा..

आमदार सुहास आण्णा रहेनुंमा फाउंडेशन संपर्क कार्यालयाचे उद़घाटन सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न

आमदार सुहास आण्णा रहेनुंमा फाउंडेशन संपर्क कार्यालयाचे उद़घाटन सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे): मुस्लिम समाजातील विविध सामाजिक, शासकीय प्रश्न सोडवण्यासाठी आमदार सुहास...

read more
भारतीय खाद्य निगम मनमाडच्या गोदामात कारभाराची ऐशीतैशी – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवारांकडून कानउघाडणी

भारतीय खाद्य निगम मनमाडच्या गोदामात कारभाराची ऐशीतैशी – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवारांकडून कानउघाडणी

मनमाड शहरात भारतीय खाद्य निगम,अन्न महामंडळाचे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे गोदाम...

read more
मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील असुविधांबाबत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवारांचे अहवाल सादर करण्याचे आदेश

मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील असुविधांबाबत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवारांचे अहवाल सादर करण्याचे आदेश

मनमाड शहरातील अन्न महामंडळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री...

read more
.