मनमाड : स्वातंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान, गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यू. कॉलेज मध्ये राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक श्री.शेवाळे सर यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली.
या वेळी मुख्याध्यापक श्री. शेवाळे भुषण दशरथ तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील उपशिक्षिका सौ. कराड सविता सचिन यांनी केले तसेच संस्थेचे सदस्या आयशा गाजीयानी मॅडम, संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर यांचे मार्गदर्शन लाभले.