मनमाड लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त छत्रे विद्यालयाच्या वतीने एकता रॅली सह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. एकतेची व सलोख्याची प्रतिज्ञा क्रीडा शिक्षक हरीश चंद्रात्रे यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना दिली.शाळांना सुट्ट्या असताना देखील शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले. मुख्याध्यापक आर एन थोरात ,उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.त्यांच्यासह रॅलीत विदयार्थी, शिक्षक सहभागी झाले.या वेळी सरदार पटेलांचा विजय असो, भारत माता की जय या घोषणांनी परिसर दुमदुमला. संस्थेचे अध्यक्ष पी जी दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी,प्रसाद पंचवाघ यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

राशी भविष्य : १८ऑगस्ट २०२५ – सोमवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....