मनमाड : ( योगेश म्हस्के )मनमाड ते मुंबई दररोज प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांची जीवनवाहिनी असणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसचा 47 वा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात मनमाड रेल्वे स्टेशन येथे पावरकार स्टाफ , ईटीयल स्टाफ आणि प्रवाशांचा वतीने साजरा करण्यात आला.
मनमाड ते मुंबई धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेस ही गाडी 1 नोव्हेंबर 1975 रोजी सुरू करण्यात आली होती , मनमाड ते मुंबई दररोज प्रवास करणाऱ्या शेकडो चाकरमान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसला आज 47 वर्ष पूर्ण झाले असुन , या निमित्ताने गाडीला फुले व फुग्यांनी सजवून , मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडुन आणि पेढे वाटुन मोठया थाटामाटात पंचवटी एक्सप्रेसचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुखअतिथी म्हणुन अरुण कुमार (SSC ETL) , आर. पी. सोनवणे (JE) , दिपक पवार (loco Inspector) हे लाभले होते . कार्यक्रमाचे आयोजन रोहित भालेराव , पावर स्टाफ , ईटीयल स्टाफ यांच्या वतीने करण्यात आले , यावेळी ज्ञानेश्वर म्हैसे , नितीन वरकड , दिपक बारे ,सम्यक आहिरे , शुभम आहिरे , सतीश झालटे , समीर खान , बघेल साहेब आदी उपस्थित होते.