loader image

निवृत होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा दिलासा

Nov 2, 2022


केंद्र सरकारने एक दिलासादायक निर्णय घेऊन असंख्य केंद्रीय कर्मचाऱ्यांबाबतच्या महत्त्वाच्या नियमात बदल केला आहे.

रिटायरमेन्ट बॉडी फंडने 6 महिन्यापेक्षा कमी काळात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार, निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीएफ योजना 1995 नुसार लाभ दिला जाणार आहे. तसा निर्णयही सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे निवृत्तीच्या आधी सहा महिन्यांच्या काळात कधीही पीएफचे पैसे काढता येऊ शकणार आहेत.

सीबीटी अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या वतीने एक प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सादर करण्यात आलेला हा प्रस्ताव अखेर केंद्र सरकारने बैठकीत मान्य केला. त्यामुळे असंख्य निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सीबीटीच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे 6 महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्या ईपीएश खात्यातून पैसे काढता येणे शक्य होणार आहे.

देशात ईपीएफचा लाभ घेणारे 6 कोटीपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. ही संख्या येत्या काळात आणखी वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जावे, यासाठीही धोरणात्मक पावलं उचलण्याची गरज असल्याचं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.