मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालययात आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले या स्पर्धाचे उद्घाटन महात्मा गांधी विद्यामंदिर या संस्थेचे उपाध्यक्ष मा. डॉ. हरीश आडके यांच्या हस्ते व माजी आमदार राजेंद्र देशमुख, पाेलिस निरीक्षक मा. प्रल्हाद गिते, महाविद्यालयीन व्यवस्थापन परिषद सदस्य मा श्री चंद्रकांत गोगड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. उद्घाटनपर भाषणात मा. डॉ आडके यांनी विद्यार्थ्यांना खेळाविषयी मार्गदर्शन तसेच कबड्डी स्पर्धेची पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना सांगून खेळामुळे युवकांचे जीवन घडू शकते असे प्रतिपादन केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतुन महाविद्यालयातील क्रीडा विभागाची माहिती सांगितली. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मनमाड शहर पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते त्यांनी खेळाडूंना खेळाबरोबरच वेळेच्या नियोजनाचे महत्त्व पटवून सांगितले.यावेळी माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन केले. याप्रसंगी वाहुळकर साहेब, मा. सचिव इंगळे, उपसचिव नरेंद्र निकम, दीपक जुंद्रे, पंच सतीश सूर्यवंशी, बीओएस चेअरमन डॉ सुरेखा दप्तरे, प्रा. रिजवान खान, माजी क्रीडा संचालक विजय पाटील उपस्थित होते. स्पर्धेमध्ये एकूण ५० संघांनी आपली उपस्थिती नोंदवली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा.संतोष जाधव यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ पी जे आंबेकर यांनी केले. महाविद्यालयाचे कुलसचिव समाधान केदारे महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार खेळाडू प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ४२ सामने झालेले होते. मनमाड महाविद्यालय, नामपूर महाविद्यालय, सुरगाणा महाविद्यालय तसेच दिंडोरी महाविद्यालयाने प्राबल्य मिळवले होते.

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये माता पालक सभा संपन्न
मनमाड - येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये माता पालक सभा संपन्न झाली. या सभेस उद्बोधन करण्यासाठी...