loader image

महावितरणच्या विद्युत साहित्याच्या दरसूचीमध्ये (कॉस्ट डाटा) वाढ

Nov 4, 2022


प्रसिध्दी पत्रक

महावितरणच्या विद्युत साहित्याच्या दरसूचीमध्ये (कॉस्ट डाटा) वाढ

मुंबई/नाशिक, दि.४ नोव्हेंबर २०२२:

वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण, आधुनिकीकरण तसेच पायाभूत सुविधा उभारणीची कामे नियमितपणे करावी लागतात या कामांसाठी लागणाऱ्या विविध तांत्रिक साहित्याच्या दरसूचीमध्ये (कॉस्ट डाटा) वाढ करण्याचा निर्णय महावितरणकडून घेण्यात आला आहे.

महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध विद्युतीकरणाच्या पायाभूत सुविधा उभारण्यात येतात. या पायाभूत सुविधांची कामे करण्यासाठी महावितरणकडून वेळोवेळी दरसूची जाहीर करण्यात येत असते. मात्र, करोना महामारीच्या कालावधीनंतर आता विद्युतीकरणासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झालेली आहे. सद्यस्थितीत २०१९-२० या वर्षांची म्हणजे करोना महामारीच्या पूर्वीची दरसूची या कामासाठी लागू आहे.

सध्या लागू असलेल्या दरसूचीमध्ये वाढ करण्याची मागणी विविध स्तरांवरून महावितरणकडे करण्यात आली होती. महावितरणने दरसूची अद्ययावत करण्यासाठी एका समितीची स्थापना करून या समितीने दरसूचीमध्ये बदल करण्यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार सदर समितीने दरसूचीमध्ये सुचविलेल्या बदलास महावितरणच्या प्रशासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. नवीन दरसूची लवकरच जाहीर करण्यात येणार असून यामुळे महावितरणच्या नवीन पायाभूत सुविधा उभारण्याच्या कामास गती मिळणार आहे. याचा लाभ राज्यातील सर्व विद्युत ग्राहकांना होणार आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.