loader image

नांदगाव तालुका स्तरिय क्रिकेट संघाची मनमाड येथे निवड

Nov 5, 2022


नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशनद्वारा किशोर सुर्यवंशी मेमोरियल ट्रॉफी या स्पर्धेसाठी नांदगाव तालुक्यातील खेळाडुंची निवड प्रक्रिया मनमाड येथे संपन्न झाली. दरवर्षी या सामन्यांचे आयोजन नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन यांच्यातर्फे केली जाते. यासाठी जिल्हा आसोसिएशन निवड समीतीमधील बाळासाहेब मंडलिक सर , विभास वाघ सर तसेच संजय परिडा सर ह्यांच्याद्वारे नांदगाव तालुका संघाची निवड यंदा करण्यात आली. या प्रक्रियेत नांदगाव तालुक्यातील भरपुर खेळाडुंचा प्रतिसाद मिळाला ज्यामध्ये निवड झालेले खेळाडु सिध्दार्थ रोकडे , रोहित पवार , शुभम बिडगर , कैलास सोनवणे , अंशुमान सरोदे , रितेश पगारे , धीरज पवार , प्रशांत सांगळे , चैतन्य पाठक , सागर सौदे , अक्षय जाधव , सिकंदर मोगल , धीरज जाधव , संकेत परदेशी व ओमकार ठोंबरे हे ठरले. 16 तालुक्यातील संघ या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवणार आहे व या खेळाडुंना नांदगाव तालुका संघाकडून नाशिक येथे सामने खेळण्याची संधीही मिळणार आहे. या निवड चाचणीचे आयोजन श्री. जयकुमार फुलवाणी यांच्याद्वारे करण्यात आले. नांदगाव तालुका संघाचे प्रशिक्षक मनोज ठोंबरे सर तसेच संघ व्यवस्थापक जाविद सर हे ही या चाचणिस उपस्थित होते तसेच हि निवड चाचणी पार पाडण्यात त्यांनीही खास परिश्रम घेतले व त्यासोबत भुमी क्रिकेट अकॅडमीचाहि सहयोग यात प्राप्त झाला.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.