मनमाड नगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित मनमाड च्या सन 2022-2027 साठीच्या निवडणुकीत कामगार परिवर्तन पॅनलचे बहुमतात आहे तसेच सदरील पतसंस्थेच्या चेअरमन,व्हा.चेअरमन पदासाठी दि 27.10.2022 रोजी निवडणुक प्रक्रिया पार पडुन कामगार परिवर्तन पॅनल चे श्री रामदास पगारे यांची चेअरमन पदी तर श्रीमती राजेशबाई राजेंद्र चावरीया याची व्हा.चेअरमन पदावर बिनविरोध निवड झाली.
तद्नंतर नवनिर्वाचित चेअरमन श्री रामदास पगारे यांनी पतसंस्थेच्या सभासदांना देण्यात येणारा संस्थेचा लाभांश विविध कारणांमुळे झालेला विलंब पहाता तातडीने लाभांश देण्याबाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणे बाबत आज दि 28.10.2022 रोजी तात्काळ नवनिर्वाचित सर्वच संचालक मंडळाची बैठक घेऊन कमीत कमी कालावधीच्या मुदतीत वार्षिक सभा घेऊन लाभांश वाटप करणे बाबत निर्णय घेणेत आला तसेच मागिल सभेचे ईतिवॄत्त, अंदाजपत्रक,ताळेबंद,नफातोटा पत्रकास मंजुरी देणे बरोबरच सदरील मनमाड नगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित मनमाड च्या तज्ञ संचालक पदावर संस्थेचे सभासद तसेच महाराष्ट्र नगरपरिषद,नगरपंचायत कर्मचारी,संवर्ग कर्मचारी संघटना ,राज्य उपाध्यक्ष श्री किरण आहेर यांची तज्ञ संचालक पदा नियुक्ती करणे बाबत ठराव बहुमताने पारीत करण्यात येऊन तज्ञ संचालक पदावर श्री किरण आहेर यांची निवड करण्यात आली असता कामगार ,सभासदां कडुन मोठ्या प्रमाणात अभिनंदन,शुभेच्छा देण्यात आले तसेच चेअरमन,सचिव तसेच संचालक मंडळा कडुन सत्कार करण्यात आला.

राशी भविष्य : ११ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना...