loader image

राजाभाऊ धोंडगे यांचा सत्कार

Nov 7, 2022


आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांची आरती *तालुका ऊपप्रमुख (मशाल)*राजाभाऊ धोंडगे यांच्या हस्ते करण्यात आली,व सत्कार करण्यात आला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तालुका उप प्रमुख पदी येथील राजाभाऊ धोंडगे यांची निवड करण्यात आली. काल सामना दैनिकात विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या घोषणा करण्यात आल्या.आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांची आरती तालुका ऊपप्रमुख (मशाल) राजाभाऊ धोंडगे यांच्या हस्ते करण्यात आली व त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नानासाहेब शिंदे,जीवन पाटील, बाळासाहेब निकम यांसह अनेक जण उपस्थित होते.

आज रविवार दिनांक ६/११/२०२२ रोजी मनमाड नगरपरिषद कामगारांची सहकारी पतसंस्था सोसायटी ची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा सकाळी ११ :३० वाजता मनमाड नगरपरिषद डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात नवनिर्वाचित चेअरमन कॉ. रामदास पगारे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीने पार पडली. सर्व प्रथम महापुरुषांच्या फोटो स पुष्पहार घालून अभिवादन करण्यात येऊन मनमाड नगरपरिषदेच्या मयत झालेल्या कामगार सभासद व त्याच्या नातेवाईक तसेच या मनमाड शहरातील ज्ञान अज्ञात व्यक्तींना दोन मिनिटे उभे राहून भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात येऊन सभेला सुरवात करण्यात आली या सर्व साधारण सभेला नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन श्रीमती राजेशबाई चावरिया.तसेच नवनिर्वाचित संचालक कॉ. सुभाष केदारे.कॉ.किशोर आहिरे. श्री प्रमोद सांगळे. श्री.तुषार बोराडे. तज्ञ संचालक श्री किरण आहेर तसेच संचालक श्री रविद्र थोरे.श्री.बाबासाहेब दराडे. श्री. किशोर व्यवहारे. सौ. सरला सिलेलान.सह समाज सेवक श्री संजय चावरिया तसेच कामगार सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होऊन . चर्चेत सहभागी झाले यात श्री आनंद औटी. कॉ.जॉनी जॉर्ज.कॉ.विकास गायकवाड. श्री संजय नोरोटे. श्रीअंबादास बनसोडे.श्री कैलास पाटील.श्री.विलास हुकीरे. हाजी असलम शेख. श्री संजय दिवडे.श्री.अविनाश कटारे. समीर शेख.अशपाक शेख ईत्यादी कामगार सभासद यांनी आपली मते मांडली.आजची प्रथम वार्षिक सभेत कामगार सभासदांना १०% लांभाश मंजूर करुन सोमवारी प्रत्येक सभासदांच्या खात्यात जमा करण्यात येईल.

कामगार सभासदांकरीता ६ दिवसात १४ लाख ५५ हजार कर्ज वाटप करुन मॄत्यू फंडात रु २०००/वाढ करण्यात येऊन ७०००/-रुपये करण्यात आला.
आकस्मिक कर्ज म्हणून रु १००००/ तात्काळ देणार .संस्था वाढीसाठी नवीन सभासद करण्यात येणार नवीन सभासदाकरीता रु ११००/ भरुन नियम अटी च्या अधीन राहून सभासद करण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच मेडिक्लेम पाॅलीसी बाबत सभासदांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्यात येईल.असे अनेक महत्त्वाचे व संस्थेचे हीत व कामगार सभासद हीताचे निर्णय घेण्यात आले. पुढील काळात अनेक हीताचे निर्णय घेण्यासाठी सर्वाची सहकार्याची अपेक्षा चेअरमन संचालक मंडळ व सचिव यांनी व्यक्त केली व शेवटी सर्वाचे आभार सभेचे अध्यक्ष कॉ रामदास पगारे व्यक्त करुन सर्वाच्या वतीने राष्ट्रगीत म्हणून सभा संपली असे अध्यक्षांच्या वतीने सांगण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.