आज मनमाड नगर परिषद येथे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत बि.एल.ओ. यांची मीटिंग झाली या वेळी मुख्याधिकारी श्री.सचिन पटेल उपस्थित होते. सर्व BLO यांच्याशी आमदारांनी चर्चा केली, त्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी ऐकून घेतल्या. BLO नी प्रत्येक घरी जाऊन मतदार नोंदणी आधार लिंक करून घेण्यासाठीची सूचना ह्यावेळी आमदार कांदे यांनी उपस्थित बी एल ओ यांना करून कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना केल्या. ह्या बैठकीत काही BLO नी ग्राउंड लेव्हल वर जन जागृतीची गरज असल्याचे बोलून दाखवले, या वर आमदारांनी त्यांना जनजागृती साठी रिक्षा फिरवणे, कॅम्प साठी कार्यकर्ते उपलब्ध करून देण्यात येईल असे सूतोवाच दिले. कोणत्याही व्यक्ती चा हस्तक्षेप न ऐकता प्रामाणिकपणे काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. BLO च्या पगारा बाबत आमदारांनी सकारात्मक पाऊल उचलत लवकरच पगाराची रक्कम अदा करण्यात येईल असे आश्वासन दिले.
या वेळी न. प.तर्फे प्रशासक सचिन पटेल आमदार सुहास आण्णा कांदे यांचे स्वागत केले.

राशी भविष्य : २९ऑगस्ट २०२५ – शुक्रवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....