loader image

बघा व्हिडिओ – आमदार कांदे यांच्या उपस्थितीत बी एल ओ बैठक संपन्न : बी.एल. ओ कामासाठी पुढाकार घेणार

Nov 7, 2022

आज मनमाड नगर परिषद येथे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत बि.एल.ओ. यांची मीटिंग झाली या वेळी मुख्याधिकारी श्री.सचिन पटेल उपस्थित होते. सर्व BLO यांच्याशी आमदारांनी चर्चा केली, त्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी ऐकून घेतल्या. BLO नी प्रत्येक घरी जाऊन मतदार नोंदणी आधार लिंक करून घेण्यासाठीची सूचना ह्यावेळी आमदार कांदे यांनी उपस्थित बी एल ओ यांना करून कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना केल्या. ह्या बैठकीत काही BLO नी ग्राउंड लेव्हल वर जन जागृतीची गरज असल्याचे बोलून दाखवले, या वर आमदारांनी त्यांना जनजागृती साठी रिक्षा फिरवणे, कॅम्प साठी कार्यकर्ते उपलब्ध करून देण्यात येईल असे सूतोवाच दिले.  कोणत्याही व्यक्ती चा हस्तक्षेप न ऐकता प्रामाणिकपणे काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. BLO च्या पगारा बाबत आमदारांनी सकारात्मक पाऊल उचलत लवकरच पगाराची रक्कम अदा करण्यात येईल असे आश्वासन दिले.
या वेळी न. प.तर्फे प्रशासक सचिन पटेल आमदार सुहास आण्णा कांदे यांचे स्वागत केले.

अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.