loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या विश्वस्त संपदा दीदी हिरे यांच्या हस्ते आंतर विभागीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

Nov 7, 2022


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या विश्वस्त मा. संपदा दीदी हिरे यांच्या शुभहस्ते झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ हरीश आडके यांनी कबड्डी स्पर्धेविषयी सविस्तर माहिती खेळाडूंना दिली तसेच महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे संवर्धक कै. लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांच्या काही आठवणींना उजाळा दिला. खेळात केवळ विजय महत्त्वाचा नसून पराजय सुद्धा भविष्यातल्या विजयाचा मानदंड असतो असा आत्मविश्वास डॉ. हरीश आडके यांनी उपस्थित खेळाळूना दिला.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी संपदा दीदी हिरे यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. मुलांसाठीच्या या कबड्डी स्पर्धेसाठी पुणे, नगर, नाशिक इत्यादी ठिकाणाहून कबड्डी संघ सहभागी झाले होते. दुपारी ४:००वाजता या स्पर्धांना प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून डॉ. पाटील यांनी कबड्डी खेळासाठी असलेला महाविद्यालयाचा इतिहास सांगितला व ऐनवेळी चांदवड येथे होणाऱ्या स्पर्धांसाठी मनमाड महाविद्यालय खुले करून दिले व निकोप वातावरणात स्पर्धा पार पडतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या विश्वस्त संपदा दीदी हिरे, संस्थेचे उपाध्यक्ष तथा माजी प्राचार्य हरीश आडके, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण मंडळाचे सहाय्यक संचालक डॉ. दत्ता महादम,जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रमोद आंबेकर, स्पर्धा निरीक्षक प्रमोद शिंदे, राष्ट्रीय दर्जाचे पंच सतीश सूर्यवंशी, आदी उपस्थित होते.उपस्थित प्रमुख मान्यवराचे सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ हरीश आडके यांच्या हस्ते तसेच प्रमुख अतिथी संपदा दीदी हिरे यांच्या हस्ते झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण पाटील यांनी विविध क्रीडा संघाच्या प्रमुखांचा महाविद्यालयातर्फे सत्कार केला.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नैपुण्य मिळवलेले हर्षाली मिस्कर, करुणा रमेश गाडे, नूतन दराडे,वृषाली निवृत्ती गांगुर्डे, दिया किशोर व्यवहारे, विना संतोष आहेर या खेळाडूचा सन्मान संपदा दीदी हिरे यांच्या हस्ते करण्यात आला. कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित झालेले निवड समितीचे अध्यक्ष दत्ता शिंपी, प्रा. शांताराम ढमाले, निवड समिती सदस्य प्रा.रावसाहेब गराड, आदी यावेळी उपस्थित होते. तसेच , पुणे शहर येथून प्रा अभिजित, अहमदनगर विभागातून डॉ रवींद्र खंदारे, नाशिक विभागातून दीपक जुंदरे आदींचा सन्मान महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य पाटील यांनी केला.
कबड्डी स्पर्धेच्या नियम व अटी तसेच स्पर्धेच्या मर्यादा याबाबत स्पर्धकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. दत्ता महादम यांनी मार्गदर्शन केले.यावेळी राष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय होळकर, महाविद्यालयाचे प्रथम क्रीडा संचालक प्रा पी.टी. वाघ, नगरसेवक सुनील पाटील, पुणे जिल्ह्यातून सुनील पानसरे, भाऊसाहेब थोरात, भीमराव पाटील,नाशिक विभागातून ज्ञानेश्वर गडाख, प्रदीप वाघमारे आधी मान्यवरांचा प्राचार्य पाटील यांनी यथोचित सन्मान केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक प्रा. संतोष जाधव तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर यांनी केले. सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कनिष्ठ विभागाचे क्रीडा शिक्षक महेंद्र वानखेडे, एन.सी.सी विभागाचे कॅप्टन प्रकाश बर्डे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी पवन सिंग परदेशी, श्री प्रशांत सानप श्री रोहन बागुल यांनी विशेष परिश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

  शनिवार, दि.08 फेब्रुवारी 2026 रोजी कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

  मनमाड शहर भाजपा च्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक व भाजपा च्या कार्यकर्त्यांन चे प्रेरणा...

read more
एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

  मनमाड : इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 केंद्र क्रमांक 0236 एच.ए....

read more
शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

      मनमाड : येथील शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या सिद्धी क्लासेस...

read more
नरेंद्रजी मोदी 3-0 सरकारचा ऐतिहासिक अर्थ संकल्पा मध्ये देशातील “युवा शक्ती केंद्र बिंदू.”देशाच्या प्रगतीची गती  वाढवणारा गतिमान अर्थ संकल्प ~नितीन पांडे

नरेंद्रजी मोदी 3-0 सरकारचा ऐतिहासिक अर्थ संकल्पा मध्ये देशातील “युवा शक्ती केंद्र बिंदू.”देशाच्या प्रगतीची गती वाढवणारा गतिमान अर्थ संकल्प ~नितीन पांडे

संपूर्ण जगात सतत युद्ध जन्य परिस्थिती चे संकट असताना भारताचे शक्तिशाली पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी  निमित्त गुरुवार दिनांक 05/02/2026 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम🚩

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 05/02/2026 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम🚩

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.