loader image

बघा व्हिडिओ – मंत्री अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मनमाड राष्ट्रवादी चे आंदोलन

Nov 9, 2022


महाराष्ट्राचे कृषि मंत्री तथा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मनमाड शहर राष्ट्रवादीने मंगळवारी आक्रमक पवित्रा घेत निदर्शने केले. सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी केली.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मनमाड शहरात त्याचे तीव्र पडसाद उमटले. मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील एकात्मता चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र जमत अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. खा. सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत जे आक्षेपार्ह वक्तव्य केले ते माणुसकीला न शोभणारे असून एका जबाबदार राजकीय नेत्याकडून असे वक्तव्य अशोभनिय आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आशा असंस्कृत व्यक्तीवर कायदेशीर व कठोर कार्यवाही करावी. अब्दूल सत्तार यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. सत्तार यांचा फोटो असलेली उलटा बॅनर धरून समोर ५० खोके एकदम ओके चे खोके ठेवण्यात आले होते. यावेळी मंडल अधिकारी श्री नरोटे यांना मागण्यांचे निवेदन देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली. कठोर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी शहराध्यक्ष दिपक गोगड, सेवादल जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष हबीब शेख, कार्याध्यक्ष नाना शिंदे, महिला आघाडी शहराध्यक्ष अपर्णा देशमुख, प्रकाश बोधक, शहर उपाध्यक्ष योगेश जाधव, आंनद बोथरा, अमोल गांगुर्डे, पृथ्वीराज शिंदे, कोमल निकाळे आदीसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
.