मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील रसायन शास्त्राचे प्राध्यापक राहुल अशोक शिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रधान करण्यात आली. त्यांनी प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली “सिंथेसिस अँड कंप्युटेशनल स्टडी ऑफ चालकोन्स अँड थायोझोल डेरिव्हेटिव्हस ऑफ अँटी मायक्रोबियल इंटरेस्ट” या विषयावर प्रबंध सादर केला. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी समाजश्री डॉ. प्रशांतदादा हिरे, संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्वभाऊ हिरे, संस्थेचे विश्वस्त युवानेते डॉ. अद्वयआबा हिरे, प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर बंधू-भगिनी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. त्यांना डॉ. बी. एस. देसले, डॉ. विष्णू आडोळे व प्रा. रोहित शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न
मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...