मनमाड शहर बाळासाहेबांची शिवसेना व युवासेनेची शहर कार्यकारणी व पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी जाहीर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मनमाड शहर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची मनमाड शहराची शिवसेना व युवा सेना यांची मनमाड शहर कार्यकारणी निवडण्यासाठी शिवसेना आमदार सुहास अण्णा कांदे यांचे मालेगाव नाका येथील संपर्क कार्यालयात मंगळवार दिनांक १५/११/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या सूचनेनुसार सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
सर्व इच्छुक शिवसैनिकांनी बैठकीला वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे, युवासेना शहरप्रमुख योगेश इमले,आसिफ शेख यांनी केले आहे.

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये माता पालक सभा संपन्न
मनमाड - येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये माता पालक सभा संपन्न झाली. या सभेस उद्बोधन करण्यासाठी...