नांदगाव शहरातील मानसी कलेक्शन येथून चोरीला गेलेल्या दुचाकीचा आणि चोरट्याचा छडा लावण्यात नांदगाव पोलिसांना यश आले आहे.दोन दिवसांपूर्वी शहरातील वर्दळीच्या ठिकाणाहून मांडवड येथील आहेर यांची दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी त्यांनी नांदगाव पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीच्या अनुषंगाने नांदगाव पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा माग काढत गणेश शिवाजी सानप याला तालुक्यातील तळवाडे येथून ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून चोरीला गेलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरिक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. अनिल शेरेकर, पो.ह.कु-हाडे, पो.ह.सुर्यवंशी अधिक तपास करीत आहेत..

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये माता पालक सभा संपन्न
मनमाड - येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये माता पालक सभा संपन्न झाली. या सभेस उद्बोधन करण्यासाठी...