loader image

करंजवन योजना सर्वांच्या प्रयत्नांचे फलित – गणेश धात्रक !

Nov 13, 2022


दशकांपासून मनमाड शहराला भेडसावणारा आणि प्रत्येक निवडणुकीत प्रमुख मुद्दा असलेला पाणीप्रश्न कायमस्वरूपी हद्दपार व्हावा, यासाठी आलेली करंजवन पाणीपुरवठा योजना शहराला नवसंजीवनी देणारी आहे. सदर योजना अंतिम टप्यात असून योजनेचे टेंडर निघणार आहे. या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढले आहे. सदर प्रसिद्धी पत्रकात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी, विरोधपक्ष, शहरातील विविध पक्ष, संघटना, पत्रकार, पालिकेचे सर्व नगरसेवक, एमजीपीचे अधिकारी, कर्मचारी सर्वांचेच यश असल्याचे प्रतिपादन धात्रक यांनी केले आहे.

शहराचा लोकसंख्येचा वाढता आलेख पाहता वागदर्डी धरणातून पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होणे अशक्य आहे. यासाठी शहरातील विविध पक्ष संघटनांनी आंदोलने केली विविध योजना सरकार दरबारी मांडल्या. मनमाड बचाव कृती समितीने दाखल केलेल्या जनहित याचिकेमुळे मनमाड शहराला पाणीपुरवठा करणेकामी योग्य योजनेचा प्रस्ताव एमजीपीला सुचविण्यात आला. त्यानुसार करंजवन पाणीपुरवठा योजना पुढे आली आणि सोमवारी टेंडर निघणार आहे. योजनेसाठी तत्कालीन नगराध्यक्षा सौ. पद्मावतीताई धात्रक यांनी विशेष प्रयत्न केले. माजी पालकमंत्री गिरीष महाजन यांचेकडे शिष्टमंडळासह योजना मंजुरीसाठी पाठपुरावा करीत त्यांनी योजनेला चालना देत मंजुरीकामी सर्व हायड्रोलिक डिझाईन पालिकेने एमजीपीकडे सादर केली. करंजवण येथील पाण्याचे आरक्षण ठरविण्यात आले. योजनेच्या टेक्निकल मंजुरीसाठीची सरकारी फी रु.३ कोटी माजी नगराध्यक्षा सौ.धात्रक यांनी रक्कमेचे १० हफ्ते करून भरले. योजना पूर्ण झाल्यानंतर पाणीसाठा करण्यासाठी पालिकेचे फिल्टर हाऊस व पाण्याच्या टाक्या सुधारण्यासाठी प्रस्तावित जागा पालिकेमार्फत खरेदी करण्यात आली, त्यामुळे योजना मंजुरीचा मार्ग सुकर झाला. तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आघाडी सरकारच्या काळात योजनेसाठी एक्सलेशन क्लॉज लागू करण्यात आल्यामुळे अंतिमतः टेंडर काढण्याचा मार्ग मोकळा होऊन सदर योजनेचे टेंडर काढण्यात येणार आहे.

सर्वांनी सहकार्य केल्याने योजना अंतिम टप्प्यात…

करंजवण पाईपलाईन योजना पुर्णत्वास नेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधीपक्ष नेते अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री ना.डॉ. भारती पवार, आ.बाळासाहेब थोरात, पालकमंत्री दादा भुसे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तसेच आजी- माजी लोकप्रतिनिधी, जनहित याचिकाकर्ते मनमाड बचाव कृती समिती, वेळोवेळी उपोषण, आंदोलन, मोर्चे काढणारे कार्यकर्ते, सर्व पत्रकार, डॉक्टर, वकिल, पालिकेचे सर्व नगरसेवक, सामाजीक
संघटना आदींच्या सहकार्य पाठींब्यामुळे करंजवन पाणीपुरवठा योजना शेवटी मार्गी लागली आहे.


अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.