नांदगाव सोमनाथ घोंगाणे
महाराष्ट्र राज्य पणन संचलनालयाच्या वतीने पोखरी ता.नांदगाव जि. नाशिक येथे नियोजित सानप कृषी खाजगी बाजार समितीचा परवाना पणन संचालक श्री. सुनील पवार यांच्या हस्ते कासारी ता.नांदगाव जि.नाशिक येथील अग्रेसर शेतकरी व व्यापारी श्री.जयंत भाऊ सानप यांचे बंधू तसेच कासारी ग्रामपंचायतचे सरपंच श्री.हेमंत शिवाजी सानप यांना मंगळवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी प्रदान करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र राज्य पणन संचालक सुनील पवार साहेब, उप संचालक नितीन काळे उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या मालाला जास्तीत जास्त मोबदला मिळवून देण्यासाठी ह्या खाजगी बाजार समितीची स्थापना करण्यात आलेली असून शेतकरी व व्यापारी यांचा योग्य तो समन्वय साधला जाईल तसेच येणाऱ्या काळात नांदगाव तालुका तसेच परिसरातील शेतकऱ्यांचा आर्थिक उत्कर्ष घडवण्याचा आपला मानस असल्याचे हेमंत सानप ह्यांनी सांगितले.
तसेच पणन संचालक सुनील पवार साहेब यांनी सानप कृषी खाजगी बाजार समिती साठी योग्य मार्गदर्शक सूचना देवून शुभेच्छा दिल्या.
जयंत सानप व हेंमत सानप यांचे नांदगाव शहर तालुक्यातून अभिनंदन होत आहे .