मनमाड सार्वजनिक वाचनालयास संदीप देशपांडे लिखित “सांग ना आई ” हे पुस्तक भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे मंचावर लेखक संदीप देशपांडे, मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, जेष्ठ संचालक नरेश गुजराथी, माजी अध्यक्ष सुरेश शिंदे, प्रज्ञेश खांदाट आदी मान्यवर उपस्थित होते. मनमाड शहरातील प्रसिद्ध कवी, विनोदी लेखक, प्रभावी वक्ते, विध्यार्थी प्रिय शिक्षक, प्रकाशक आणि पत्रकार, मनमाड सार्वजनिक वाचनालय चे जेष्ठ नियमित वाचक श्री संदीप देशपांडे सर यांचे नुकतेच दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी बालदिना निमित्ताने “सांग ना आई ” हे बाल कविता चे पुस्तक प्रसिद्ध झाले,आहे संदीप देशपांडे हयांचे हे लेखन क्षेत्रातील 11वे पुस्तक असून या पुस्तकास डॉ पृथ्वीराज तौर संचालक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांची प्रस्तावना लाभली आहे. पुस्तक प्रकाशन नंतर प्रथम मनमाड सार्वजनिक वाचनालयास हे पुस्तक भेट देण्यात आले वाचनालया तर्फे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा यांनी ही भेट स्वीकारली तर नरेश गुजराथी व सुरेश शिंदे यांनी शाल व गुलाबपुष्प देऊन संदीप देशपांडे यांचा गौरव सत्कार केला. संदीप देशपांडे यांनी मनमाड शहराचे नाव मराठी साहित्यात विशेषतः विनोदी आणि बाल साहित्य क्षेत्रात नेहमी अग्रेसर ठेवले आहे ही मनमाड साठी अभिमानास्पद बाब आहे असे अध्यक्ष नितीन पांडे यांनी सांगितले नरेश गुजराथी यांनी या नवीन पुस्तकाची सविस्तर उत्तम समीक्षा करीत देशपांडे यांना याच पुस्तकाचा इंग्रजी भाषेत अनुवाद करणेचा आग्रह केला. ज्या मनमाड सार्वजनिक वाचनालयाने मला घडवलं,वाचन, लेखन क्षेत्रात समृद्ध केले त्यास या 11 व्या पुस्तकाची प्रथम भेट समर्पित असे संदीप देशपांडे यांनी या प्रसंगी सांगत याच नवीन प्रकाशित पुस्तकातिल कविता चे वाचन केले कार्यक्रम चे सूत्र संचालन करीत कल्पेश बेदमुथा यांनी या पुस्तक भेटी बद्दल वाचनालय तर्फे ऋण /आभार व्यक्त केले या कार्यक्रमास मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ संध्या गुजराथी, हेमंत मटकर, सौ नंदिनी फुलभाटी, मछिंद्र साळी, महेश बोराडे यांचे सह वाचक उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालया चे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले.
















