loader image
[ays_poll id=7]

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ विजयी

Nov 16, 2022


मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्यातर्फे राबविण्यात आलेल्या शासकीय शालेय तालुकास्तरीय १९ वर्ष आतील मुलांच्या क्रिकेट स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय हा संघ विजयी झाला. नांदगाव तालुकास्तरीय १९ वर्षाखालील विद्यार्थ्यांच्या क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये मनमाड कनिष्ठ महाविद्यालय व इंडियन हायस्कूल या संघात लढत झाली व यात मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाने अंतिम विजेतेपद पटकावले. मनमाड कनिष्ठ महाविद्यालय हा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाला आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य ज्योती पालवे, पर्यवेक्षक विठ्ठल फंड, क्रीडा शिक्षक महेंद्र वानखेडे, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी विजय संघाचे अभिनंदन केले.


अजून बातम्या वाचा..

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 16/05/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 16/05/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.