दिनांक 17 नोव्हेंबर बुधवार रोजी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाने मनमाड शहरात बाळासाहेबांची शिवसेना वतीने हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शहरातील विविध ठिकाणी या कार्यक्रमांची रूपरेषा खालील प्रमाणे आहे.
छ.शिवाजी महाराज चौकात वंदनीय बाळासाहेबांचे मोठे बॅनर ( स्टेज ) प्रतिमापूजन व अभिवादन कार्यक्रम. सकाळी 9:00 वाजता ,सुभाष चौक ( कालीकामाता चौक ) येथे प्रतिमा पूजन
सकाळी 9:30 वाजता, ग्रामीण रुग्णालय येथे रुग्ण कल्याण समिति तर्फे ( दिनेश घुगे , महिंद्र गरुड ) वतीने रुग्णांना फळ वाटप . सकाळी 10:00 वा, सोनू पोहाल यांच्या वतीने जयश्री थिएटर जवळ स्टेजवर प्रतिमा पूजन. सकाळी 10: 30 वा.बाळासाहेब ठाकरे चौक ( निमोन चौफुली ) येथे प्रतिमा पूजन. सकाळी 11 वा.
,महिला आघाडी तर्फे गोरगरिबांना शिवभोजन वाटप सकाळी 11:30 वाजता मालेगाव नाका, कार्यालय जवळ, बुरकुलवाडी येथे प्रतिमापूजन व शालेय साहित्य वाटप. सकाळी 12:00 वा, बुधलवाडी येथे प्रतिमापूजन, व मराठी शाळेत शालेय साहित्य वाटप . 12:30 वा, प्रतिमा पूजन व गोरगरिबांना फळ वाटप, गायकवाड चौक 52 नंबर 1:00 वा,रेल्वेस्टेशन, टॅक्सी स्टँड येथे गोरगरिबांसाठी अन्नदान. सायं. 7 वा .
या कार्यक्रमासाठी सर्व शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, शिवसैनिक व आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शहर प्रमुख मयूर बोरसे, युवासेना शहर प्रमुख योगेश इमले, आसिफ शेख यांनी केले आहे.