loader image

हेमांगी शर्मा आणि सफान फारुकी यांची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड

Nov 17, 2022


मनमाड येथील कंचनसुधा स्कूल मधील दोन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. हेमांगी परेश शर्मा आणि सफान नफिस फारुकी यांनी पी.डी. सुराणा ज्युनियर कॉलेज चांदवड येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला ह्या दोन्ही विद्यार्थ्यांची नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना त्यांचे क्रीडा शिक्षक धिरज पवार व पंकज त्रिवेदी यांचे मार्गदर्शन लाभले. ह्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री अजयजी जैन,उपाध्यक्ष श्री अक्षयजी जैन, कोआर्डिनेटर सौ. रानी भंडारी, मुख्याध्यापक तसेच
स्पोर्ट्स टीचर धिरज पवार व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्याचे कौतुक होत आहे.


अजून बातम्या वाचा..

.