loader image

बिझनेस फंडा – सुखांत अंत्यसंस्कार कंपनी करतेय विधिवत धार्मिक संस्कार

Nov 18, 2022


प्रत्येक धर्मांमध्ये माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत केल्या जाणाऱ्या धार्मिक संस्कार व विधींना विशेष महत्त्व असून आजच्या धकाधकीच्या आणि विखुरलेल्या जगात अनेकदा आपल्याच रक्ताच्या नात्याच्या मंडळींनाही आपल्यासाठी जिवंतपणी वेळ काढणे शक्य होत नाही, अशावेळी मृत्यूपश्चात करावयाचे विधी पद्धतशीर होतील याची शाश्वती देता येत नाही. आपण आयुष्यभर ज्या मानाने राहतो त्याच मानाने आपले अंत्यसंस्कारही व्हावे अशी अनेकांची इच्छा असते याच इच्छेने मराठमोळ्या संजय रामगुडे यांच्या व्यवसायाचा पाया रचला आहे. ठाणे बिझनेस यात्रेच्या निमित्ताने नवनवीन संकल्पनाचे स्टार्टअप चर्चेत आले होते मात्र यात सुखान्त अंत्यसंस्कार कंपनीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
२०१४ साली संजय रामगुडे या मराठमोळ्या व्यक्तीने अंत्यसंस्काराची कंपनी सुरु केली. आपल्या आयुष्याचा अंत सुखाचा व्हावा या हेतूने या कंपनीचे नाव सुखान्त असे ठेवण्यात आले. आतापर्यंत २५,००० हुन अधिक अंत्यसंस्कार या कंपनीमार्फत करण्यात आले आहेत. कोरोनाकाळात दोन वर्षांमध्ये या कंपनीने शेकडो निराधारांचे अंत्यसंस्कार केले आहेत. आतापर्यंत ५० लाख रुपयांचा व्यवसाय रामगुडे यांनी केला असून या कामात त्यांच्यासह २० कर्मचारी कार्यरत असतात.

पुढील तीन वर्षात २००० कोटीचे मार्केट व्यवस्थापित करण्याचा संजय यांचा मानस आहे. प्राप्त माहितीनुसार संजय यांच्या कंपनीत २२० खांदेकरी, अंत्यसंस्कार विधी करणारे २० भटजी , व १० शववाहिकांचे टाय अप आहे. २४ तास ही सेवा उपलब्ध असून यात अंत्यसंस्कार व पिंडदान, अस्थिविसर्जन, तेरावं, चौदावंपर्यंतचे सगळे विधी तसेच त्यानंतर पक्ष, मासिक व वार्षिक श्राद्धाचे पॅकेज उपलब्ध आहेत. मृत व्यक्तीच्या कुटुंबाला मृत्यू दाखला देण्यापासून त्या मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ त्यांनीच दिलेला एक आवडीचा शेवटचा फोटो फ्रेम करण्यापर्यंत सर्व काही या कंपनीच्या माध्यमातून पार पाडले जाते.
ह्या सगळ्यासाठी संजय यांनी अत्यंत वाजवी दरात अंत्यसंस्कार पॅकेज तयार केले आहेत. यातील सर्वात बेसिक पॅकेज हे साडे आठ हजारापासून सुरु होत असून त्यांच्याकडे ३७ हजारापर्यंत पॅकेज उपलब्ध आहेत. हे पॅकेज घेताना संपूर्ण रक्कम अॅडवान्स जमा केल्यास मृत्यूपूर्वी उर्वरित आयुष्यात प्रत्येक वाढदिवसाला पार्टी व आकर्षक गिफ्ट देण्याची सुद्धा योजना यात समाविष्ट आहे.


अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
.