परभणी जिल्हा क्रिकेट आसोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या अंडर-16 नाशिक जिल्हा संघाच्या निवड चाचणी मध्ये मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमी मधील रुषी शर्मा , अध्ययन चव्हाण , स्वामी दिंडे या खेळाडुंची ( अंडर-16 ) संभावितांच्या यादि मध्ये निवड झाली. या निवड चाचणीस परभणी व जिल्हयातील इतर भागातून या चाचणीस परभणी येथे हजर होते. निवड झालेल्या खेळाडुंना परभणी येथे होणाऱ्या सराव सामण्यात खेळण्यास संधी दिली जाईल व त्यापुढे त्यांचे चयन केले जाईल.
मनमाड शहरातुन हे खेळाडु जिल्हा संघासाठी रुषी शर्मा , अध्ययन चव्हाण , स्वामी दिंडे हे खेळुन मनमाड चे प्रतिनिधीत्व जिल्हासंघात करावे अशी शुभेच्छा सर्वाकडुन जागोजागी देण्यात येत आहेत. या प्रक्रियेत सर्व निवड झालेले खेळाडु आता परभणी संघात जागा मिळवण्यासाठी परभणी येथे सराव सामने खेळणार आहेत.
भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड चे आधारस्तंभ श्री. ईरफानभाई मोमीन व मार्गदर्शक मा. राजाभाऊ पगारे , मा. गणेशभाऊ धात्रक , मा. संजय निकम , श्रेणिक बरडिया , हबीबभाऊ शेख , सिध्दार्थ बरडिया,परवेज भाई शेख , कौशल शर्मा ,तय्यबभाई शेख , नितीन आहिरराव , सनी पाटिल , शुभम ( बापु ) गायकवाड , सनी फसाटे , मनोज ठोंबरे सर तसेच संचालक वाल्मीक रोकडे व सिध्दार्थ ( भोला ) रोकडे यांच्या तर्फे रुषी शर्मा , अध्ययन चव्हाण , स्वामी दिंडे यांचे अभिनंदन करुन पुढिल होणार्या सामण्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.