शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ` ठाकरे) नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील, असे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.
उपजिल्हा युवा अधिकारी – आशिष घुगे (नांदगाव), तालुका युवा अधिकारी – सनी फसाटे (नांदगाव), उपतालुका युवा अधिकारी – पवन पवार (नांदगाव), योगेश शर्मा (नांदगाव), राहुल सांगळे (नांदगाव), शहर युवा अधिकारी – अंकुश गवळी (मनमाड), इरफान शेख (मनमाड), शहर चिटणीस स्वराज करकाळे – (मनमाड), उपशहर युवा अधिकारी – किरण सोळसे (मनमाड), प्रकाश सनासे (मनमाड).