loader image
[ays_poll id=7]

प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत सामील होत के.आर टी च्या विद्यार्थ्यांनी अनुभवला सामाजिक शास्त्र विषयाचा अभ्यासक्रम

Nov 22, 2022


मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये शाळेच्या हेडबॉय, हेडगर्ल आणि व्हाईस हेडबॉय, व्हाईस हेडगर्ल ची निवडणूक नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. या निवडणुकीत हेडगर्ल म्हणून कु. भक्ती तुषार चौधरी तर व्हाईस हेडगर्ल म्हणून कु. श्रावणी अमर चव्हाण आणि हेडबॉय म्हणून आदित्य राजेश सोनवणे तर व्हाईस हेडबॉय म्हणून वेद आदिनाथ सांगळे यांनी सर्वाधिक मते मिळवून विजय मिळविला. विजयी उमेदवार विद्यार्थ्यांचे शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर सर, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे सर, श्री. वैभव कुलकर्णी सर, श्री. धनंजय निंभोरकर सर आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी अभिनंदन केले आहे. सामाजिकशास्त्र या विषयामधील भारतीय लोकशाही, निवडणूक आयोग, निवडणूक प्रक्रिया, आचार संहिता आणि राजकीय पक्ष इ. अभ्यासक्रमाची माहिती विद्यार्थ्याना प्रत्यक्ष मिळावी, निवडणूक कशी असते याचा अनुभव विद्यार्थ्याना प्रत्यक्ष मिळण्यासाठी वरील पदांसाठी शाळेत दरवर्षी लोकशाही पद्धतीने ही निवडणूक घेतली जाते. या वर्षी हेडबॉय पदासाठी ५ विद्यार्थ्यांनी तर हेडगर्ल या पदासाठी ३ विद्यार्थिनीनी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून शाळेतील शिक्षिका सौ. संगीता कदम-देसले व कु. अमिता झाडे यांनी निवडणूक प्रक्रिया जाहीर करणे, उमेदवारांनी अर्ज भरण्याची तारीख, अर्ज माघारी घेण्याची तारीख, अर्ज जमा करून त्यांची छाननी करणे, उमेदवारांना चिन्ह वाटप करणे, प्रचार प्रक्रिया, मतदानाची तारीख, मतमोजणी करून निकाल जाहीर करणे इ. बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांनी आपली कामगिरी चोखपणे पार पाडली.उमेदवार विद्यार्थ्यांनी आपला निवडणूक प्रचार करतांना भित्तीपत्रके लावणे, वैयक्तिक भेटी घेऊन आपली बलस्थान मतदारांना सांगून योग्यता पटवून देणे, मतदानाचे आवाहन करणे, आपल्या चिन्हांचा अर्थ आणि महत्व सांगून चिन्ह मतदारांवर ठसवणे इ. पद्धतीचा अवलंब केला. मात्र प्रचार करतांना परिपाठ आणि मध्यान्ह सुट्टीतच प्रचार करून इतर विद्यार्थ्यांना आणि शालेय वातावरणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली. शालेय क्रीडांगणावर मतदान केंद्र उभारून मतदारयादीतील मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर काळ्या शाईचे निशाण करून गुप्त मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक स्वतंत्र कक्षात मतपत्रिकेवर शिक्का मारून मतपेटीत टाकण्यापर्यंत सर्व प्रक्रिया नियमानुसार पार पाडण्यात आली. शालेय विध्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मतदानाचा अधिकार बजावल्याचा एक वेगळा आनंद झळकत होता. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या निवडणुकीच्या निकालाचे सर्व उमेदवारांनी खिलाडूवृत्तीने स्वागत केले.

या निवडणुकीबाबत विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

१) मला या पदावर निवडून दिल्याबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक यांचे आभार मानते. जसं मला निवडून आल्याचा आनंद आहे. तसेच खूप दु:खपण आहे. कारण माझी बालपणाची मैत्रीण या पदासाठी छान होती. परंतु ती निवडून आली नाही. मात्र तिला दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मत मिळाल्याने मी माझी सहाय्यक राहणार हे खूप आनंददायक आहे. मला निवडणूक खूप आवडली. आम्ही १८ वर्षाच्या आतच मतदान केले. छान छान प्रचार केला. आमचं चीन्ह आकर्षक बनविण्याचा प्रयत्न केला. बोलण्याचा सराव वाढविला. माझ्या शालेय जीवनात हा अनुभव खूप छान वाटला.
– भक्ती तुषार चौधरी

२) मी के.आर.टी. शाळेत मागील १२ वर्षापासून आहे. दरवर्षी शाळेत होणाऱ्या निवडणुका मी बघते. तेव्हा मला नेहमी वाटायचं कि मी पण निवडणूक लढवावी. यावर्षी मला निवडणूक लढण्याची संधी मिळाली. परंतु मला निवडणुकीत विजय मिळाला नाही. मला डॉ. कलमांच वाक्य आठवत, ते म्हणतात ‘हरल्यामुळे वाईट वाटायचं काहीच कारण नाही. हरण म्हणजे जिंकण्याचा पहिला टप्पा असतो. आणि विशेष म्हणजे विजयी उमेदवार माझी जिवलग मैत्रीणच आहे आणि मी माझ मत स्वतः ला न देता तिलाच दिलेलं होत.
– श्रावणी अमर चव्हाण

३) हेडबॉयसाठी होणाऱ्या निवडणुकीत मी शिक्षक-शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या मतांमुळे मी विजयी झालो. मी ही निवडणूक लढवावी असा बऱ्याच जणांचा खास आग्रह होता. त्यांच्या पाठींब्यामुळे मी हि निवडणूक लढवली. निवडणुकीतील माझ्या विजयाचा आनंद माझ्याबरोबरच इतरानाही झाला. या निवडणुकीमुळे लोकशाही पद्धतीतील निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्षात अनुभवता आली, या बद्दल शाळेचे खूप खूप आभार. तसेच माझे प्रतिस्पर्धी असलेल्यानीदेखील निकाल खिलाडूवृत्तीने स्विकारला याबद्दल त्यांचे आभार.
– आदित्य राजेश सोनवणे


अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.