loader image
[ays_poll id=7]

जय भवानी व्यायामशाळेच्या व मनमाड महाविद्यालयाच्या खेळाडूंना 3 सुवर्ण व 2 रौप्य

Nov 22, 2022

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन हुतात्मा राजगुरू महाविद्यालय राजगुरू नगर येथे 21 11 2022 रोजी करण्यात आले महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड व जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत घवघवीत यश संपादन केले दिया किशोर व्यवहारे हिने 45 किलो वजनी गटात सुवर्णपदक, वैष्णवी जनार्धन उगले हिने 64 किलो वजनी गटात सुवर्णपदक, धनश्री विनिद बेदाडे हिने 81 किलो वजनी गटात उत्तम कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले नूतन बाबासाहेब दराडे हिने 55 किलो वजनी गटात रौप्यपदक व वैष्णवी वाल्मिक इप्पर हिने 59 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावित सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे आयोजित आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली
यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड,डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी,कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड चे प्राचार्य डॉ अरुण पाटील,क्रीडा संचालक प्रा संतोष जाधव छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक देशपांडे एस व्ही,पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस,यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व....

read more
किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

मनमाड : मनमाड सतत मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुला मुलींची नाळ मातीशी पुन्हा जोडण्यासाठी आयोजित...

read more
श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

read more
ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

  ढेकू ( प्रतिनिधी ) ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक संचालित माध्यमिक आश्रम शाळा ढेकू येथे...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.