loader image
[ays_poll id=7]

शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांचे उपोषण आश्वासना नंतर मागे

Nov 22, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे
नांदगाव तालुक्यातील विविध शाळामधुन शालेय पोषण आहारअंतर्गत मदतनीस म्हणून काम करताना केवळ मध्यान्ह भोजन शिजविण्याचे आमचे काम आहे. मात्र शाळेतील मुख्याध्यापक भांडी धुण्यापासून तर शाळेचे वर्ग साफसफाई करण्यापर्यंतची सर्वच कामे आम्हाला करायला लावतात. या कामांच्या मोबदल्यात सरकार काय देते तर दिवसाला अवघे तीस रुपये व काम करण्यास नकार दिल्यानंतर कामावरून काढण्याची धमकी दिली जाते. ही समस्या दूर करावी या मागणीसाठी नांदगाव तालुका शालेय पोषण आहार महिला समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयाजवळ बेमुदत उपोषण सुरू केले होते. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश चौधरी व शिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले यांना निवेदन देण्यात आले.
आम्ही करीत असलेल्या कामाच्या मानधनात आशा वर्कर यांच्या धर्तीवर वाढ होऊन किमान 10 ते 12 हजार रुपये मानधन मिळावे. अगोदरही शासन स्तरावर वेळोवेळी प्रस्ताव देऊन मागणी केली आहे . मात्र, अजूनही प्रस्तावावर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने आम्हाला आगामी हिवाळी अधिवेशनात याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन न्याय द्यावा, ही विनंती यावेळी महिलांनी केली.
दरम्यान,आहार शिजविणाऱ्या महिलाना कुठलेही काम शाळेच्या मुख्याध्यापकांनी देवू नये असे निर्देश गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांनी दिले तर तालुका स्तरावर मानधन वाढीबाबत कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार आपल्याला नाहीत. त्यामुळे आपल्या मागण्या वरिष्ठ कार्यालयाकडे कळविण्यात येतील, असे आश्वासन मिळाल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी संगीता सोनवणे,शोभा भोसले,नफिसा शेख,आशा काकळीज,तब्बसुम शेख, सरला मोढे,संगीता मोकळ,भारती देवकर,संगीता गुंजाळ, ललिता खैरणार यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या .


अजून बातम्या वाचा..

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.